जवेरिया शेख या खेळाडूनी बेस्ट फायटर ऑफ द नाईट बेल्ट पटकावले
प्रतिनिधि:नदीम शेख हिंगणघाट
हिंगणघाट:नुकत्याच दिनांक 10 ते 11 जानेवारी ला नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र थाईबॉक्सिंग राज्यस्तरीय असोसिएशन कप 2026 या स्पर्धेचे आयोजक थाईबॉक्सिंग असोसिएशन नांदेड या स्पर्धेत क्रीडा भlरती क्लब, हिंगणघाट यांनी पहिल्यांदाच सहभाग घेत ऐकून 5 खेळाडूने शानदार कामगिरी करत 4 सुवर्ण पदक व 1रजत पदक प्राप्त केले आणि बेस्टफायटर बेल्ट पटकावले. कोच ठाकूर सुशांतसिंह गहेरवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या या खेळाडूनी राज्यस्तरावर हिंगणघाटचे नाव उंचावले आहे. त्यात सहभागी होणारे खेळाडू व पदक प्राप्त खेळाडूंचे नावे देवांशी बंगालवर ही अगदी 10 वर्षाची असून ह्या चिमुकलीने रजत पदक पटकाविले तसेच 14 वर्षा आतील वजन गटात भावितव्य वानखेडे आणि 17 वर्षा खालील वयोगटात जवेरिया शेख,अंतरीक्ष पाटील , या दोघानी उत्कृष्ठ खेळाच प्रदर्शन करत सुवर्णपदक प्राप्त केले ,19 वर्षा खालील वय गटात निर्मेश शेंडे यानी कठीण संघर्ष करत सुवर्ण पदकाची कमाई केली आणि खुला बेस्ट फायटर ऑफ द डे मुली यात जवेरिया शेख या खेळाडूनी बेस्ट फायटर ऑफ द नाईट हा बेल्ट पटकावले. या सर्व खेळाडूंना त्यांच्या पालकांचा आणि प्रशिक्षकांचा पाठिंबा होता.या सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल पालकांनी व क्रीडा शिक्षक ठाकूर सुशांतसिंह गहेरवार सर , आशिष वांढरे सर फैजान शेख सर निशांत एखंडे सर कबीर महेशगौरी सर आणि महिला कोच नम्रता दुबे मॅडम व रूपाली शिरसागर मॅडम आणि निवेदिता देवतळे मॅडम यांनी विजयी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले व येणाऱ्या राष्ट्रीयस्तरीय पातळी करिता शुभेच्छा दिल्या.