राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत लकी क्लब चे घवघवीत यश

Mon 19-Jan-2026,03:41 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत येथील खेळाडूचे सातारा येथे १६ ते १८ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत लकी स्पोर्टिंग क्लब च्या मुलांनी घवघवीत यश मिळवले आहे. या स्पर्धेत अंडर १४ वर्ष मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर 19 वर्षे मुलांचा संघानेही प्रथम क्रमांक मिळविला आहे व तसेच अंडर 19 मुलीच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.अंतिम सामन्यात त्यांना चुरशीचा सामना देत सर्वांची मने जिंकली आहे. या यशाबद्दल लकी स्पोटिंग क्लबचे अध्यक्ष लक्ष्मीकांत नवघरे, सदस्य शेख नूर ,शेख जब्बार ,विजय कुदाऴे, सय्यद युनूस, सुनील माळवटकर, शेख इजाज ,केदार कहाळेकर, मुग्धा मॅडम ,संजय उबारे ,तसेच सर्व पालक वर्ग ,अदिनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.