शिक्षक विशाल सुरकार यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह; सामाजिक संदेश देणारा आदर्श सोहळा

Sun 26-Apr-2026,01:27 AM IST -07:00
Beach Activities

शिक्षक विशाल सुरकार यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह; सामाजिक संदेश देणारा आदर्श सोहळा

 

तालुका प्रतिनिधी – सुनील हिंगे, आल्लीपूर

 

आल्लीपूर : स्थानिक रहिवासी शिक्षक विशाल सुरकार आणि पल्लवी यांनी सत्यशोधक समाजाच्या परंपरेनुसार विवाह करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. या विवाह सोहळ्याद्वारे त्यांनी साधेपणा, समानता आणि सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश दिला.

या अनोख्या विवाहाने पारंपरिक रूढींना आव्हान देत, नव्या विचारांची दिशा दाखवली. लग्न समारंभात पारंपरिक तांदळाऐवजी फुलांचा वापर करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी वधू-वरांचे फुलांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

विशाल सुरकार आणि पल्लवी यांनी सर्व पारंपरिक विधी टाळून, साध्या आणि सत्यशोधक पद्धतीने विवाह पार पाडला. या उपक्रमातून शेतकऱ्यांप्रति आदर व्यक्त करण्यात आला तसेच धान्याची नासाडी टाळण्याचा संदेशही देण्यात आला.

ही परंपरा १९व्या शतकातील महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या विचारधारेवर आधारित आहे. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याला गावातील तसेच परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.