ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
वर्धा | विशेष प्रतिनिधी – युसुफ पठाण
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज वर्धा जिल्ह्याला भेट देत ऐतिहासिक सेवाग्राम आश्रम येथे उपस्थिती लावली.
राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी आश्रमातील बापू कुटीची पाहणी केली तसेच बापूंनी वापरलेल्या कार्यालयाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.
यानंतर राष्ट्रपतींनी प्रार्थना सभेत सहभागी होत आश्रमातील शांत व आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणही केले.
या भेटीदरम्यान राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री पंकज भोयर, जिल्हाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपतींच्या या भेटीमुळे सेवाग्राम आश्रम परिसरात ऐतिहासिक व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.
Related Photos
Related News
भर पावसात ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
04-Jul-2026 | Naved Pathan
एड. इब्राहिम हबीब बख्श को राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार-2026 से किया जाएगा सम्मानित
05-Jun-2026 | Naved Pathan
वर्धा सिविल हॉस्पिटल में बड़ी लापरवाही व्हीलचेयर नहीं, मरीज को कुर्सी पर लाने की सलाह!
13-Apr-2026 | Naved Pathan