वर्ल्ड मेमन डे निमित्त लेडीज विंग, बसमत मेमन जमात ट्रस्टतर्फे महिला रुग्णांना फळांचे वाटप

Sat 11-Apr-2026,07:21 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:वसमत येथील वर्ल्ड मेमन डे निमित्त बसमत मेमन जमात ट्रस्टच्या लेडीज विंगतर्फे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला ग्रामीण रुग्णालय, बसमत येथे दाखल प्रसूती (डिलिव्हरी) रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश रुग्णांमध्ये आनंद, काळजी आणि सकारात्मकता निर्माण करणे हा होता. कार्यक्रमास डॉ. अजय लोकडे, डॉ. सेलुकर, डॉ. जाधव तसेच रुग्णालयातील वरिष्ठ महिला कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.

सदर उपक्रम बसमत मेमन जमात ट्रस्टचे अध्यक्ष अजीज पिराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असून, सचिव फिरोज कच्छी यांनी समन्वय साधला. स्वयंसेवक अरमान तांडी यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.

फळांचे वितरण लेडीज विंगच्या सदस्यांनी — नसीमा फारूक पोची, सुनेहरा सलीम तांडी, फिरोजा अख्तर तांडी, अप्सिन सलीम तांडी, नाजिया अनीस तांडी, रुबीना शोएब पीराणी, अमरीन फरहान पीराणी आणि सोबिया बानो पोची — यांनी केले.

बसमत मेमन जमात ट्रस्टची लेडीज विंग सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असून, वर्ल्ड मेमन डे निमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा ठरला.