सहकार सप्ताहानिमित्त वृक्षारोपण; वृक्ष सेवा समितीच्या मोहिमेत शासकीय अधिकारी व सहकारी संस्थांचा पर्यावरण संकल्प
सहकार सप्ताहानिमित्त वृक्षारोपण; वृक्ष सेवा समितीच्या मोहिमेत शासकीय अधिकारी व सहकारी संस्थांचा पर्यावरण संकल्प
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा | सहकार सप्ताहानिमित्त सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (वर्धा) कार्यालय, जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था आणि वृक्ष सेवा समितीच्या 'राज्याभिषेक ते शिवजयंती वृक्षारोपण मोहिमे' अंतर्गत शनिवारी (दि. ४ जुलै) सिंदी (मेघे) येथील स्मशानभूमीलगतच्या टेकडीवर भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या पर्यावरण उपक्रमाला सहाय्यक निबंधक सुचिता गुघाणे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी, "केवळ वृक्षारोपण करून थांबणे पुरेसे नाही, तर लावलेल्या प्रत्येक रोपाचे संवर्धन व संगोपन करणे ही काळाची गरज आहे. सहकार क्षेत्राने पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे," असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार अधिकारी श्रेणी-१ आशिष बगमारे, सहकार अधिकारी श्रेणी-२ नरेंद्र नागतोडे तसेच कनिष्ठ लिपिक खेमचंद कोरचा यांनी विशेष परिश्रम घेतले.
या हरित उपक्रमात वृक्ष सेवा समितीचे पदाधिकारी, विविध नागरी व ग्रामीण सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, कर्मचारी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, बेरोजगार सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांच्या सामूहिक सहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी भूषण पाटील, प्रदीप मेंढे, रवींद्र नागपूरकर, भानुदास सोमनाथे, अरुण कोटगीलवार, ओमकुमार कडू, लोकेश निनावे, अजय दाखोडे, उमंग तेलरांधे, प्रविण तांबोळी, योगेश लेंढे, गजानन गुल्हाने, सिम्पली बिसन, ओंकार नाडे, सतीश बिसे यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
सहकार क्षेत्र आणि पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय साधत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.