सेवाग्राम रुग्णालयात विचित्र प्रकार; रुग्णांना नेण्यासाठीचे स्ट्रेचर तरुणांच्या बसण्याचे ठिकाण बनले

Wed 08-Jul-2026,12:32 AM IST -07:00
Beach Activities सेवाग्राम रुग्णालयात विचित्र प्रकार,

सेवाग्राम रुग्णालयात विचित्र प्रकार; रुग्णांना नेण्यासाठीचे स्ट्रेचर तरुणांच्या बसण्याचे ठिकाण बनले

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा,वर्ध्यातील सेवाग्राम रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरले जाणारे स्ट्रेचर काही तरुणांनी बसण्याचे ठिकाण बनवल्याचे दिसून आले आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील शिस्त आणि व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात कर्मचारी व इतर लोकांची सतत ये-जा सुरू असतानाही कोणत्याही कर्मचाऱ्याने या तरुणांना स्ट्रेचरवरून उठण्यास किंवा अशा प्रकारे बसू नये, असे सांगितले नाही. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

रुग्णांसाठी उपलब्ध असलेले स्ट्रेचर ही रुग्णालयातील अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा आहे. अशा उपकरणांचा या प्रकारे गैरवापर झाल्यास गरजू रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नागरिकांनी या प्रकाराची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी आणि रुग्णालय परिसरात शिस्त राखावी, अशी मागणी केली आहे.