शेकापूर बाई येथे अनैतिक संबंधातुन पतिचा गळा आवळून खून; मृतदेह विहिरित फेकले, चौघे आरोपी ताब्यात

Wed 19-Aug-2026,12:40 AM IST -07:00
Beach Activities

शेकापूर बाई येथे अनैतिक संबंधातुन पतिचा गळा आवळून खून; मृतदेह विहिरित फेकले, चौघे आरोपी ताब्यात

प्रतिनिधि नाजिम खान वडनेर 

वडनेर वार्ताहर :वडनेर पोलिस स्टेशन हद्दित येत असलेल्या शेकापूर बाई येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून संतोष पांडुरंग कैकाडे (वय 42) यांचा गळा आवळून खून करून मृतदेह गावाजवळील विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 16 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री 12.30 ते 1.30 वाजण्याच्या दरम्यान शेकापूर बाई येथील मृताच्या राहत्या घरी घडल्याचे समोर आले आहे. मृत संतोष कैकाडे यांच्या पत्नी सपना कैकाडे हिचे तिचे नातेवाईक शुभम रमेशराव कैकाडे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

या संबंधात संतोष कैकाडे यांचा अडथळा येत असल्याने सपना कैकाडे हिने शुभम कैकाडे व त्याचे मित्र सचिन प्रभाकर बसुणे (राहणार माढ़ेळी ता वरोरा जि. चंद्रपुर) आणि प्रशांत रमेश करपे ((राहणार माढ़ेळी ता वरोरा जि. चंद्रपुर) यांच्या मदतीने संतोष यांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर घटना कोणाला समजू नये म्हणून मृतदेह गावाजवळील बोबडे यांच्या विहिरीत फेकून दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी देवानंद पांडुरंगजी कैकाडे (वय 50, रा. शेकापूर बाई, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) यांच्या फिर्यादीवरून वडनेर पोलिस ठाण्यात अप. क्र. 323/26, कलम 103(1), 3(5) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणातील आरोपी शुभम रमेशराव कैकाडे (30)(रा शेकपुर ता. हिंगणघाट जि. वर्धा,) सचिन प्रभाकर बसुणे (30)राहणार माढ़ेळी ता वरोरा जि. चंद्रपुर)प्रशांत रमेश करपे (36)(राहणार माढ़ेळी ता वरोरा जि. चंद्रपुर)आणि सपना संतोष कैकाडे (36))(रा शेकापुर ता. हिंगणघाट जि. वर्धा,) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी शुशीलकुमार नायक परिक्षाधिन उपविभागीय अधिकारी गोविंद गवळी,ठानेदार घनश्याम पाटिल यांच्या मार्गदर्शनात वडनेर पोलिसांकडून सुरू असून हत्येच्या नेमक्या कारणासह अन्य बाबींचा तपास करण्यात येत आहे.