तान्हा पोळा पर्वाचा भव्य आयोजन सोहळा उत्साहात साजरा

Tue 15-Sep-2026,03:06 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लीपूर

 

देवळी तालुक्यातील जामनी ( चिकणी) येथे भव्य तान्हा पोळा पर्वाचे आयोजन

दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी पिरसाई बाबा देवस्थान परिसरात मागील तीन चार वर्षांपासून तान्हा पोळा पर्व मोठ्या उत्साहात व श्रद्धेने साजरा केला जात आहे. याच परंपरेला पुढे नेत यावर्षीही समस्त गावकरी मंडळी जामनी ( चीकणी यांच्या वतीने तान्हा पोळा पर्वाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने बालकांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या नंदी महाराजांसह उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. नंदी महाराजांची सुंदर सजावट, बालकांची वेशभूषा तसेच पारंपरिक रूपसज्जा यासाठी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते बालकांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एकूण १९ बालकांना पुरस्कार, व प्रत्येक नंदीला आकर्षक भेटवस्तू देऊन बालकांचा उत्साह वाढविण्यात आला.

तान्हा पोळा पर्वाच्या माध्यमातून बालकांमध्ये भारतीय परंपरा, संस्कृती तसेच गौवंशाप्रती आदर व प्रेमाची भावना जागृत करण्याचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाला समस्त गावकरी आयोजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण परिसरात पारंपरिक पर्वाचा भक्तिमय आणि आनंदमय वातावरणाचा अनुभव पाहायला मिळाला.