गहाळ १३ मोबाईलचा सेलू पोलिसांनी लावला शोध
गहाळ १३ मोबाईलचा सेलू पोलिसांनी लावला शोध
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तक्रारदारांना मोबाईल परत
सेलू (जि. वर्धा) | प्रतिनिधी : युसूफ पठाण
पोलीस स्टेशन सेलू हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईल फोनबाबत प्राप्त तक्रारींचा सातत्याने पाठपुरावा करत सेलू पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत हरवलेले एकूण १३ मोबाईल फोन शोधून काढण्यात सेलू पोलिसांना यश आले आहे.
दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सदर मोबाईल संबंधित तक्रारदारांना अधिकृतरीत्या परत करण्यात आले. यामध्ये
मनोज भांडेकर, रा. वडगाव खुर्द — Oppo कंपनीचा मोबाईल (अंदाजे किंमत १५,००० रुपये),
कैलास मांढरे, रा. वॉर्ड क्रमांक ४, सेलू — Oppo कंपनीचा मोबाईल (अंदाजे किंमत १६,००० रुपये)
यांच्यासह इतर ११ तक्रारदारांचे गहाळ झालेले मोबाईल फोन पोलिसांनी शोधून सुपूर्द केले आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर मोहिमेत पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर तसेच पोलीस अंमलदार ज्ञानदेव वनवे (पो. स्टे. सेलू) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सेलू पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या तत्परतेचे व कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.