बल्लारपूरमध्ये गांजाचे सेवन करताना तीन तरुणांना अटक : कलम २७ एनडीपीएस ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल
प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर:बल्लारपूर शहरातील पेपर मिल न्यू कॉलनी परिसरात गांजाचे सेवन करताना तीन तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस ठाणे बल्लारपूर येथे एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी २०२६ रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार टेकडी विभागत पेट्रोलिंगवर असताना पेपर मिल न्यू कॉलनी परिसरतील पडक्या क्वार्टर मध्ये तीन तरुण गांजाचे सेवन करताना आढळून आले.
दम मारो दम पोलीसांनी आरोपी रोहीत उप्पल विश्वास, (वय २०) रा. विवेकानंद वार्ड, बल्लारपुर जि. चंद्रपुर, आरोपी संघर्ष किशोर तेलतुमडे, (वय २०) रा. मक्का मस्जिद जवळ, राजेंद्र प्रसाद वार्ड, बल्लारपुर, रोहित दिपक दुर्गे (वय २०), रा. दादाभाई नौरोजी वार्ड, त्रिशरण बुध्द विहार जवळ, बल्लारपुर, जि. चंद्रपुर यांना तात्काळ ताब्यात घेतले.आरोपींचा झडतीदरम्यान गांजा ओढण्यासाठी वापरण्यात येणारी चिलम, अर्धवट जळालेला गांजाची राख व अवशेष तसेच धूर ओढण्यासाठी वापरलेला मळकट कपडा मिळून आला. सदर साहित्य पंचासमक्ष घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.सर्व तिन्ही आरोपी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे झिंगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याची वैद्यकीय तपासणी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. तपासणीदरम्यान त्याचे रक्त व लघवीचे नमुने घेण्यात आले.
या प्रकरणी आरोपी रोहीत उप्पल विश्वास, संघर्ष किशोर तेलतुमडे, रोहित दीपक दुर्गे विरुद्ध पोलीस ठाणे बल्लारपूर येथे एन. डी. पी. एस. कायद्याच्या कलम २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, शब्बीर खान पठाण, पोहवा प्रवीण निकोडे, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, पुरुषोत्तम चिकाटे, विकास जुमनाके, नापोअं सचिन अल्लेवार, पोअं खंडेराव माने, गुरू शिंदे, लखन चव्हाण, शरदचंद्र कारूस यांनी केले.