पूर्ती पब्लिक स्कूल येथे 77 वा गणतंत्र दिवस साजरा

Tue 27-Jan-2026,04:13 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधि गुलशन बनोठे सालेकसा 

सालेकसा-मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था रेंगेपार कोहळी द्वारा संचालित पूर्ती पब्लिक स्कूल & ज्युनियर कॉलेज सालेकसा, खिलेश महाविद्यालय सालेकसा , एस आर बी महिला महाविद्यालय सालेकसा, वीर बिरसा मुंडा अनुदानित आश्रम शाळा सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने 77वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थासचिव डॉ.राजेंद्र बडोले सर, प्रमुख अतिथी संस्थाअध्यक्ष शालिनी बडोले खेमराज साखरे, अध्यक्ष पूर्ती बहुउद्देशीय संस्था सालेकसा,संदीप डेकाटे ,नगर सेवक , अजय डोये ,नगर सेवक,प्रेरणा बंडीवार, नगरसेविका,उईके नगर सेविका,छन्नू शिवणकर, नगरसेविका,पल्लवी शिवणकर,नगरसेविका, प्रतिभा शिवणकर, नगरसेविका,सुनीता उईके.मेघा चुटे ब्रजभुषण बैस, राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य सालेकसा, मायकल मेश्राम ,सुशील असाटी,अध्यक्ष मोक्षधाम समिती सालेकसा ,कपूरचंद अग्रवाल,येटरे सर,हुसेन चौधरी सर, मुख्याध्यापक वीर विरसा मुंडा अनुदानित आश्रम शाळा, प्रशांत बंसोड ,प्राचार्य पूर्ती पब्लिक स्कूल सालेकसा, सरस्वता बिसेन,विभाग प्रमुख एस. आर. बी. महिला महाविद्यालय सालेकसा, प्रशांत लोथे सर, मुख्याध्यापक वीर बिरसा मुंडा प्राथमिक शाळा सालेकसा, ओमप्रकाश नेवारे सर प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वप्रथम भारतमाता,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भगवान वीर बिरसा मुंडा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले तसेच माल्या अर्पण करण्यात आले.तसेच ध्वजा रोहण डॉ.बडोले सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी विविध देशभक्तीवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नृत्य ,गीत गायन, भाषण देण्यात आले. गणतंत्र दिवस निमित्ताने विद्यार्थी भारतमाता,राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,भगत सिंग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ,पंडित जवाहरलाल नेहरू,स्वामी विवेकानंद,भगत सिंग यांच्या वेशभूषेत आले. सर्व नव निर्वाचित नगरसेवक, नगरसेविका यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.तसेच संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ.बडोले सर व बडोले मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात बडोले सरांनी भारतीय राज्यघटनेला 26 जानेवारी ला त्याचा स्वीकार केला.त्या नुसार आपल्या देशात विविधतेत एकता दिसून येते.स्वातंत्र्य, समता,न्याय , बंधुता,विचार करण्याची संधी, संधीची समानता ही आपल्याला संविधानाने बहाल केली आहे.तसेच आपल्या देशासाठी जे जवान शहीद झाले अशा वीर शहिदांना स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन बागडे सर, चांदेवार सर, विद्यार्थिनी चैताली मोटघरे, प्रियांनी गुप्ता तर आभार स्फूर्ती ठाकरे यांनी मानले.कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी लोकेश चन्ने ,अंकित नागदेवे, आकाश डोंगरवार, सुजित कोटांगले, अविनाश सेलोकर, अंकुश नाकाडे, जगदीश ठाकरे, योगेश हरिणखेडे, सुशांत तांडी, दुर्गा बिसेन,किरण क्षीरसागर, प्रियंका मिश्रा, रिंपी शर्मा,मीनाक्षी ठाकूर, काजल चन्ने,रोहिणी तिरपुडे,नीता धकाते,सोनाली दहेकर, ईशा खांडेकर, अल्का कुर्वे,प्रगती टेंभुर्णे,काजल राऊत, प्रणाली भीमटे, पायल भास्कर, बैकुंठे , नंदेश्वर , शहारे ,उईके, मडावी चन्ने, सहकार्य केले.