सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न
प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत येथील अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय, वसमत येथे एलाप्पा मिटकर यांचा गौरव करण्यात आला .अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय, वसमत येथील ज्येष्ठ सहशिक्षक एलाप्पा तुकाराम मिटकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत दिलेल्या त्यांच्या मोलाच्या योगदानाचा यावेळी मान्यवरांनी गौरव केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंगरावजी कदम (माऊली) होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव विक्रम शिंदे, उपाध्यक्ष मुनीर पटेल, मुरलीधरराव मुळे, प्रा.बी.डी.कदम, सहसचिव मा. गजानन मुळे, मा. संदीप कदम व संचालक मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका . सरिता शिवाजीराव पतंगे, सुनीता शिंदे, उद्धवराव राखोंडे, शामल शिंदे, संध्या कातोरे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकव सन्मानपत्र वाचन अशोक जऊळकर यांनी केले. संस्थेच्या वतीने मिटकर यांचा सपत्नीक शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विविध शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, मित्रपरिवार व नातेवाईकांची लक्षणीय उपस्थिती होती. मनोगत व्यक्त करताना वंत्यानी मिटकरयांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, विद्यार्थप्रेिम व समर्पित सेवाभावाचा उल्लेख करत त्यांचा कार्यकाल नव्या पिढीसाठी आदर्श असल्याचे सांगितले, भाषणात मिटकर यांनी शाळेतील सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप मुरलीधरराव मुळे यांनी केला तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सरिता पतंगे यांनी केले.