कस्तुरबा महिला बहुउद्देशीय संस्थेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
कस्तुरबा महिला बहुउद्देशीय संस्थेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधि युसुफ पठाण वर्धा
वर्धा : स्थानिक कस्तुरबा महिला बहुउद्देशीय संस्था, बोरगाव (मेघे), वर्धा येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्था अध्यक्ष सौ. हेमलता मेघे मॅडम व संस्थेचे सचिव श्री अनंत मेघे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला
संस्थेअंतर्गत कार्यरत सर्व शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये प्राचार्य डॉ. शीतल आडगावकर, कस्तुरबा ई-स्कूलच्या साहेबा शेख, सोनिका जाधव, संगीता वादाफळे, जयश्री कटारे, निमा फुलबांधे, शीतल गायकवाड, राजू बावणे, अनिल नागमोते, गीता पाचखंडे, निरंजना वानखडे, शुभांगी वानखडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.