वर्धेत उष्णतेचा कहर : ४४.२°C तापमानामुळे डीपीला आग; प्रशासनाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

Wed 29-Apr-2026,07:44 AM IST -07:00
Beach Activities

वर्धेत उष्णतेचा कहर : ४४.२°C तापमानामुळे डीपीला आग; प्रशासनाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला|

 

प्रतिनिधी युसूफ पठाण वर्धा 

वर्धा शहरात वाढत्या उष्णतेमुळे बुधवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास पावडे चौक–बॅचलर रोड परिसरातील विद्युत डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली. ४४.२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. दरम्यान, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी तत्परतेने परिस्थिती हाताळत वाहतूक सुरळीत ठेवली व नागरिकांची गर्दी नियंत्रणात ठेवली.

तसेच महावितरण (MSEB) चे कर्मचारीही तातडीने घटनास्थळी दाखल होत दुरुस्तीचे काम हाती घेतले. प्रशासनाच्या समन्वयाने आणि वेगवान कारवाईमुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याचे सांगितले जात आहे.

सध्या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.