वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात साजरी
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी : सुनील हिंगे, अल्लीपूर
अल्लीपूर, दि. 30 एप्रिल 2026 : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त अल्लीपूर येथील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर, पोलीस स्टेशन रोड येथे विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
सकाळी ५.३० वाजता महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच ध्यानधारणा करण्यात आली. त्यानंतर सकाळी ६ वाजता गावातील प्रमुख मार्गांवरून रामधून काढण्यात आली. दिवसभरात प्रवचन, ‘ग्रामगीता’ पठण आदी कार्यक्रम पार पडले. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजात एकता, स्वावलंबन, ग्रामविकास, अंधश्रद्धा निर्मूलन आणि देशभक्तीचा संदेश दिला. त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत.
जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रसंतांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव प्रेमी तसेच विविध मान्यवरांनी सहकार्य केले.