निधी आशिष कोचर सीए परीक्षेत उत्तीर्ण
निधी आशिष कोचर सीए परीक्षेत उत्तीर्ण
हिंगणघाटच्या कन्येचे घवघवीत यश; शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
प्रतिनिधि निखिल ठाकरे
हिंगणघाट : येथील समाजसेवक व उद्योजक श्रीचंद कोचर यांची नात तथा आशिष कोचर आणि स्विटी कोचर यांची कन्या कु. निधी आशिष कोचर हिने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे आयोजित चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा ही देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठित व्यावसायिक परीक्षांपैकी एक मानली जाते. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रम, शिस्त, समर्पण आणि जिद्दीच्या बळावर निधीने हे यश प्राप्त केले आहे. तिच्या या यशामुळे कोचर कुटुंबासह हिंगणघाट शहराच्या शैक्षणिक क्षेत्रातील गौरवात भर पडली आहे.
निधी कोचर हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय, शिक्षक तसेच मार्गदर्शकांना दिले आहे. तिच्या या यशाबद्दल पराग कोचर, पंकज कोचर यांच्यासह संपूर्ण कोचर परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी तिचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शिक्षण क्षेत्रातील या यशस्वी कामगिरीमुळे हिंगणघाट परिसरातून निधी कोचरवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.