मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस ने घडवले हजारो यशस्वी विद्यार्थी,वसमत शिक्षण क्षेत्रात निर्माण केला नवा इतिहास.

Mon 06-Jul-2026,04:57 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत येथील मराठी आस्मिता कोचिंग क्लास चे एक स्वप्न ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे, त्याच्या डोळ्यांतील स्वप्नांना यशाची नवी दिशा मिळावी आणि समाजात त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी. हे स्वप्न १४ वर्षांपूर्वी पाहिले गेले आणि आज त्या स्वप्नाने हजारो यशस्वी विद्यार्थ्यांच्या रूपाने इतिहास घडवला आहे.

मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस, वसमत या नावाने सुरू झालेला शिक्षणाचा प्रवास आज विद्यार्थी, पालक आणि समाजाच्या विश्वासाचे प्रतीक बनला आहे. गेल्या १४ वर्षांत या संस्थेने केवळ परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी घडवले नाहीत, तर आत्मविश्वास, संस्कार आणि गुणवत्तेच्या बळावर आयुष्यात मोठी झेप घेणारी पिढी घडवली आहे.

याच यशस्वी वाटचालीचे आणखी एक सुवर्णपान म्हणजे नुकताच उत्साहात पार पडलेला जिल्हास्तरीय महापरीक्षा स्पर्धा – २०२६ गुणगौरव सोहळा. "ज्ञानवारी ते गुणगौरव" या संकल्पनेवर आधारित या भव्य कार्यक्रमात जिल्हाभरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि आकर्षक बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला. वारकरी परंपरेवरील सादरीकरण, प्रेरणादायी नाटिका, सांस्कृतिक कार्यक्रम, गीत सादरीकरण आणि कराटे प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे, मान्यवर, शिक्षक, पालक, पत्रकार आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करण्याचा संदेश दिला.

"मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस" ही केवळ शिकवणी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारे एक कुटुंब असल्याची भावना संस्थेने व्यक्त केली. पालकांनी दाखवलेला विश्वास, विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम आणि समाजाकडून मिळालेले प्रेम व सहकार्य यामुळेच हा १४ वर्षांचा प्रवास यशस्वी ठरल्याचे संस्थेने नमूद केले.

आज शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, संस्कार आणि यशाचा नवा मापदंड निर्माण करणाऱ्या मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस, वसमतने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करत ग्रामीण भागात शिक्षणाची नवी क्रांती घडवून आणल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.