वसमत तालुक्यात जनसेवा सप्ताहाची सांगता,कुरुंदा येथे मोफत शिलाई मशीन वाटप व रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जनसेवा सप्ताहा' अंतर्गत वसमत तालुक्यातील मौजे कुरुंदा येथे विविध लोककल्याणकारी कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. दुर्गा माता मंदिर परिसरात पार पडलेल्या या सोहळ्यात आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीती होती. विधानसभा अध्यक्ष आशीर्वाद (भैया) इंगोले यांच्यावतीने कुरुंदा परिसरातील रुग्णांच्या सोयीसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाला. परिसरातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आशीर्वाद इंगोले यांनी स्वखर्चातून १०० मोफत शिलाई मशीनचे वाटप केले. उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला. दुर्गा माता मंदिर, टोकाई माता आणि फुलारी आई मंदिर परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आशीर्वाद (भैया) इंगोले यांनी, "आमदार राजूभैय्या नवघरे हे माझे राजकीय गुरु आणि आदर्श व्यक्तित्व आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जनतेच्या सेवेसाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे,"असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंजाजीराव इंगोले प्रमुख पाहुणे तानाजी भेंडे, सचिन भोसले, बाळूमामा ढोरे, जिजामामा हरणे, सतीश नरवाडे, सतीश पोले, दिलीप डाडाळे, गुलाबराव पाटील, किसन चांदणे, रघुनाथ नरवाडे, गजानन डाडाळे, कुंडलिक नरवाडे, हिरामण कांचनगिरे, गौतम ढेंबरे, साहेबराव नरवाडे, मुंजाजीराव दळवी, दत्तरामजी इंगोले, चंद्रकांत दळवी, बाबुराव दळवी, अशोकराव दळवी, प्रल्हादराव इंगोले, बबनराव कदम, पांडूमामा शतलवार, बाबुराव काळे, दिलीप सोनटक्के, बबनराव शिध्देवार, रंगराव कदम, देवानंद दळवी, बालाजी दळवी, कल्याण दळवी, रवींद्र महाजन, अमोल इंगोले, गजानन दळवी, भगवान इंगोले, काशिनाथ झिळे, युवराज दळवी, रमेश दळवी, उत्तम दळवी आणि इब्राहिम पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.आयोजन व संयोजक कार्यक्रमाचे संयोजक आशीर्वाद भैया इंगोले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 'आशीर्वाद भैया मित्र मंडळ'चे अतुल दळवी, झुनाजी इंगोले, हरी दळवी, विशाल खराटे, रखमाजी इंगोले, परमेश, रियाज पठाण, फिरोज पठाण आणि अक्सत शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन व आभार पांडे सर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.