कागबन येथे गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना आमदार नवघरे यांची उपस्थिती

Thu 23-Jul-2026,08:33 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : आशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली वसमत येथील कागबन येथे आज आमदार राजू नवघरे यांच्या उपस्थितीत मधुकर नामदेव कोल्हे यांच्या स्मरणार्थ आज (दि. २३) येथील आनंद बौद्ध विहारामध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. लोकप्रिय आमदार राजु नवघरे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.

 मधुकर कोल्हे यांचे दि. १३ रोजी निधन झाले होते. त्यांच्या उत्तरकार्य आणि स्मृतीप्रीत्यक्ष, त्यांचे सुपुत्र साईनाथ कोल्हे आणि अभिजित कोल्हे यांनी मौजे कागबन येथील आनंद बौद्ध विहारात गौतम बुद्ध यांची मूर्ती स्थापित केली. या समाजोपयोगी व अनोख्या कार्याबद्दल आमदार राजु नवघरे आणि उपस्थित मान्यवरांनी कोल्हे कुटुंबाचे विशेष कौतुक केले.

याप्रसंगी संदिप घोडजकर, विकी वाघमारे, राज भालेराव, नरेंद्र करवंदे, प्रा. संतोष हंकारे, लक्ष्मण गायकवाड, सरपंच हनुमान ढवळे यांच्यासह ग्रामस्थ व बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.