बल्लारपूरात २२ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर

Tue 21-Jul-2026,07:52 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून बल्लारपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर बुधवार २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजे बल्लाळशाह नाट्यगृह, बल्लारपूर येथे आयोजित करण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुधीर मुनगंटीवार राहणार आहेत.

या शिबिरात महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम व नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या महसुली सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विविध प्रमाणपत्रे, महसुली प्रकरणे, शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन तसेच नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बल्लारपूरच्या तहसीलदार श्रीमती रेणुका कोकाटे यांनी केले आहे.