इंद्रजीत सिंह बावरी हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी व एन्काऊंटर व फाशी शिक्षा ची मागणी, हिंगणघाट तहसील सिख-सिकलीगर असोसिएशनची मागणी करण्यात आली उपभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व वर्धा जिल्हा पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले
इंद्रजीत सिंह बावरी हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी व एन्काऊंटर व फाशी शिक्षा ची मागणी, हिंगणघाट तहसील सिख-सिकलीगर असोसिएशनची मागणी करण्यात आली उपभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व वर्धा जिल्हा पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले
प्रतिनिधि नाजिम खान वडनेर
हिंगणघाट, दि. १० ऑगस्ट २०२६ : नांदेड येथील दूध डेअरी परिसरातील धनेगाव पेट्रोल पंपावर ८ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या इंद्रजीत सिंह बलजीत सिंह बावरी यांच्या हत्येच्या घटनेचा ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन (आसा) महाराष्ट्र राज्याने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही घटना अत्यंत गंभीर व संवेदनशील असून संपूर्ण सिख-सिकलीगर समाजात संताप, भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या प्रकरणात निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी, सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच नांदेड पोलिसांवरील अविश्वासामुळे DySP दर्जाच्या स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आसा संघटन राष्ट्रीय उपाध्यक्ष बलजीत सिंग बावरी त्यांचे मुलाचे हत्या प्रकरणाला एन्काऊंटर व फासी जो पर्यंत देणार नाही तोपर्यंत शिख समुदाय गप्प बसणार नाही
संघटनेने दिलेल्या निवेदनात हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, सहकारी, शस्त्र पुरवठादार व संबंधित गुन्हेगारी नेटवर्कचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच FIR, CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड, तांत्रिक पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आदी सर्व पुराव्यांची सखोल तपासणी करण्यात यावी, असेही नमूद करण्यात आले आहे निवेदन देताना हिंगणघाट तहसीलचे समूह नागरिक आसा संघटनचे महाराष्ट्र सचिव गुरुदयालसिंह जुनी यांच्या नेतृत्वात उपविभागी अधिक यांना निवेदन देण्यात आले तसेच उपस्थित राष्ट्रीय सलागार ठाकूरसिंग बावरे , प्रदेश संघटक पप्पू सिंग बावरे , प्रदेश सदस्य तरंजीतसिंग बावरी , विदर्भ सलाकार
गोविंदसिंग भाटिया , वर्धा जिल्हा उपाध्यक्ष लगबीरसिंग जुनी , नदानसिंग बावरी,
सागरसिंग भादा ,विजेंद्र सिंग जुनी , जयदेव सिंग बावरी ,हरुप सिंग बावरी , करण सिंग भादा, गुरुदयालसिंग भादा , बलविंदसिंग भादा , हरर्दिपसिंग भादा, या सर्वांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे
ऑल सिख-सिकलीगर असोसिएशनने नांदेड जिल्ह्यात सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवावी, संघटित गुन्हेगारी व अवैध शस्त्रसाठ्यावर कठोर कारवाई करावी आणि मृतकाच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण, न्यायिक मदत व शासनाकडून आवश्यक सहाय्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी केली आहे.