पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते बोरगाव येथील विविध विरंगुळा केंद्र व शेडसभागृहाचे लोकार्पण
पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते बोरगाव येथील,विविध विरंगुळा केंद्र व शेडसभागृहाचे लोकार्पण
प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा
बोरगाव मेघे येथील विविध मंदिर परिसरात डॉ.पंकज भोयर यांच्या विशेष निधीतून बांधण्यात आलेल्या शेडसभामंडप व विरंगुळा केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोरगाव ग्रामपंचायत प्रशासक सरपंच संतोष सेलूकर, जयंत कावळे, पृथ्वीराज शिंदे, सुधाकर साटोणे, नितीन डफळे, विजय ताजणे, माता मंदिर समितीचे प्रमोद हरणा, सचिन चन्ने, गिरीष काबंळे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.पंकज भोयर म्हणाले की, प्रत्येक नागरिकाची देवावर श्रद्धा आहे. या श्रध्देतून मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा कल वाढलेला आहे. राज्य शासन शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य
नागरिकांसाठी विविध योजना राबवित असतांना धार्मिक स्थळांचा विकास करण्यावर सुध्दा भर देत आहे. बोरगाव मेघे येथील तुळजाभवानी मंदिराला क वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.
तसेच बोरगाव येथील वार्ड क्रमांक 1 मधील हनुमान मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, विठ्ठल रुख्मिनी देवस्थान व महाकाली मंदिर परिसरात शेडसभामंडप व विरंगुळा केंद्र विशेष निधीतून बांधण्यात आले.
सभामंडपामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी तसेच जेष्ठ नागरिकांना विरंगुळासाठी समाधानाचे केंद्र ठरेल, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.
मंदिर परिसरातील असलेल्या खुल्या जागेवर सौदर्यीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ
असेही पुढे बोलतांना डॉ.पंकज भोयर म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर साटोणे यांनी केले. कार्यक्रमाला माजी सरपंच योगिता देशमुख, श्री. मोहिते, बोरगाव मेघे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.