व्यसनमुक्ती लोक चळवळ उभारण्यासाठी पुढाकार घ्या "व्यसनमुक्ती-नशामुक्ती" प्रतिज्ञा उपक्रम राबवा
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथे "व्यसन, केवळ एका व्यक्तीशी निगडित असले तरी अख्ख्ये कुटुंबदेखील उद्ध्वस्त होते. व्यसनांच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यांतून विविध नशामुक्त उपक्रमांची आवश्यकता आहे. व्यसनमुक्ती-नशामुक्तीसाठी लोक चळवळीच्या माध्यमातून
निरामय राज्य-राष्ट्र घडेल" असा आशावाद राज्याच्या समाज कल्याण आयुक्त मा. दिपा मुधोळ-मुंडे (भाप्रसे) यांनी नशामुक्त भारत अभियानाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आभासी दृश्यप्रणालीतून व्यक्त केला आहे.
केंद्र शासन पुरस्कृत, सामाजिक न्याय व विशेष अधिकारिता मंत्रालयान्वये मादक पदार्थांच्या गैरवापराचे निराकरणासाठी विविध राज्यात नशामुक्त भारत अभियानांतर्गत, अमली पदार्थ
वापर कमी करण्याबाबत व्यापक जागरुकता करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले.
अमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांची जनजागृती, प्रशिक्षणार्थ अमली पदार्थ कमी मागणीसाठी मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती आराखड्या अधिनस्त व्यसनमुक्ती-नशामुक्ती प्रतिज्ञेचे पाऊल उचलले.
हिंगोली जिल्ह्यातील, उपविभाग वसमत शहरातील नामवंत जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी विशाल अग्रवाल यांच्या हस्ते प्रतिज्ञा देण्यात आली. मुख्याध्यापिका कांचन रावसाहेब पतंगे अध्यक्ष होत्या. साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक प्रकाश अंभोरे,
सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल आदींची उपस्थिती होती. नशाबंदी मंडळ प्रकाशित व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शनीतून अमली पदार्थांचे भयावह दुष्परिणाम निदर्शनास आणून देण्यात आले. व्यसनमुक्ती महत्त्व विशद करणाऱ्या पत्रकाचे वितरण करण्यात आले. सहाव्या
वर्धापनदिनानिमित्त राबविण्यात आलेल्या प्रतिज्ञा उपक्रमाचे माजी व्यसनमुक्ती मंत्री जयप्रकाश साळुंके दांडेगावकर, मद्यमुक्त बांधवांचे संरक्षक प्रा. बी. डी. कदम, मुख्याध्यापिका विशाखा सोनवणे, नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे, प्राथमिक शिक्षणाधिकारी आसावरी काळे आदींनी कौतुक केले. विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षकेत्तरांची उपस्थिती होती. प्रदिप दांडेगावकर, अनुराधा देशमुख, शर्वरी जमीलोद्दीन, सिद्धार्थ कांबळे, राजकुमार अंबरखाने, राजेश दवणे जी. एस. लव्हेकर आदींची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी महामानव, राष्ट्रपुरुष-राष्ट्रमातेच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. येत्या शैक्षणिक वर्षात, प्रबोधनात्मक व्यसनमुक्ती-नशामुक्ती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी विशाल अग्रवाल यांनी सांगितले. या वेळीउपस्थितांनी घोषणा
देखील देण्यात आल्या.
ड्रग्समुक्त-नशामुक्त, व्यसनमुक्त परिसर ।
ड्रग्समुक्त-नशामुक्त, व्यसनमुक्त जिल्हा।
ड्रग्समुक्त-नशामुक्त, व्यसनमुक्त महाराष्ट्र।
ड्रग्समुक्त-नशामुक्त, व्यसनमुक्त भारत।
ड्रग्समुक्त-नशामुक्त, निरामय राष्ट्र।