अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत येथील विद्यार्थिनींनी सीमेवरील जवानांना पाठविल्या 1111 राख्या

Fri 28-Aug-2026,01:59 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी: अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत येथे आज अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय, वसमत येथील विद्यार्थिनींनी विविध ठिकाणी सीमेवर कार्यरत असलेल्या व आपले संरक्षण करीत असलेल्या भारतीय जवानांना 1111 राख्या पाठवून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.लेह, लडाख ,मिझोरम,पंजाब,आसाम,जम्मू काश्मीर येथे कार्यरत असलेले बंधू जवान याना राख्या पाठवून अशा शुभेच्छा दिल्या की... राखी फक्त एक रेशमी धागा नाही, तर त्यात आमच्या हृदयातील कृतज्ञता, प्रेम आणि तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे केलेली प्रार्थना विणलेली आहे. हा धागा तुम्हाला आठवण करून देईल की, तुम्ही एकटे नाहीत.सीमेवर जरी तुम्ही एकटे पहारा देत असाल, तर माझ्या भारत देशातील करोडो बहिणींचे आशीर्वाद आणि आपुलकी तुमच्या पाठीशी आहे.तुमचे रक्षण देव करो आणि तुम्ही नेहमी सुरक्षित राहोत हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थनाआहे.त्याच प्रमाणे सदर जवान बंधूनीही विद्यार्थिनी भगिनींची भावनिक आशयाची कृतज्ञता संदेश देऊन व्यक्त केली व आनंद व्यक्त केला.

नारळी पौर्णिमा,रक्षाबंधनाचे औचित्य साधून विद्यालयातील महिला शिक्षक भगिनींनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना राख्या बांधून औक्षण केले व रक्षाबंधना निमित्य शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व महिला शिक्षिका भगिनी व विद्यार्थिनींनी परिसरातील वडाचे झाड, पिंपळाचे झाड व इतर वृक्षांना राख्या बांधल्या व पर्यावरणाच्या संतुलनाचा संदेश परिसरातील सर्वांना दिला. या कार्यक्रमाचे नियोजन तथा आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पतंगे सरिता शिवाजीराव, पर्यवेक्षिका शामल शिंदे, प्रभारी प्राचार्या कातोरे संध्या, चौधरी मुग्धा,सर्व महिला शिक्षक भगिनींनी केले.या कार्यक्रमाचे तथा विद्यार्थिनींचे कौतुक सर्वत्र होत आहे.