गडचिरोली शिवसेना तर्फे स्व:बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती निमित्ताने दिनांक २३ जानेवारी २०२५ रोज गुरुवार ला शिवसेना जिल्हाप्रमुख आदरणीय राकेश बेलसरे यांचे अध्यतेखाली,हेमंतजी जंबेवार शिवसेना सह संपर्क गडचिरोली जिल्हा राजु कावळे ज्येष्ठ शिवसेना नेते यांचे प्रमुख उपस्थितीत,बटूवार कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे तसेच गांधी चौक गडचिरोली येथे आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाला अविनाश वरगंटीवार शिवसेना उपजिल्हा प्रमुख,वसंत गावतुरे शिवसेना गडचिरोली तालुका प्रमुख,कपिल पाल युवा नेते, अनिल ठाकुर शिवसेना चामोर्शी तालुका संघटक.पोर्णिमा इष्टाम शिवसेना महिला जिल्हा संघटीका,श्रीदेवी वरगंटीवार शिवसेना गडचिरोली विधानसभा महिला जिल्हा प्रमुख,निता वडेट्टीवार शिवसेना महिला जिल्हा प्रमुख (मागासवर्गीय विभाग), वैशाली किरमेजवार शिवसेना महिला गडचिरोली तालुका प्रमुख,शितल बन्सोड शिवसेना महिला गडचिरोली शहर प्रमुख,मेघा कोसरे धानोरा महिला तालुका प्रमुख यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.