व्हॉइस ऑफ मीडियाच्या हिंगोली जिल्हा प्रवक्ता पदी सिद्दिकी ; संघटनेच्या मासिक बैठकीत केली निवड.
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल च्या सभागृहात व्हाईस ऑफ मीडिया वसमत तालुका संघटनेची शुक्रवारी ता.१ मासिक बैठक संपन्न झाली. या बैठकीत व्हाईस ऑफ मीडिया च्या हिंगोली जिल्हा प्रवक्तेपदी ज्येष्ठ पत्रकार शमीम सिद्दिकी यांची निवड करण्यात आली. तसेच संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा लिटल किंग्ज इंग्लिश स्कूलचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी यांनी संघटनेतील सदस्यांच्या एका पाल्याला पहिली ते आठवी पर्यंतच्या सेमी माध्यमाच्या कोणत्याही एका वर्षाचे मोफत शिक्षण देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. यासह पत्रकारांच्या संदर्भात विविध हिताचे निर्णय घेण्यात आले.
मासिक बैठकीसाठी संघटनेचे हिंगोली ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय बर्दापुरे, तालुकाध्यक्ष प्रमोदराव नादरे, शहराध्यक्ष गिरीश देशमुख, मार्गदर्शक तथा ज्येष्ठ पदाधिकारी प्रा डॉ नामदेव दळवी यासह तालुका संघटनेचे पदाधिकारी सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीस प्रमोद राव नागरे यांनी मार्गदर्शन करताना तालुक्यातील संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी कार्यशील राहावे तसेच संस्थापक तथा राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप भाऊ काळे यांचे प्रकारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात सक्रिय व्हावे असे आवाहन केले. प्रा डॉ नामदेव दळवी यांनी पत्रकारांच्या आर्थिक बचतीच्या योजनेबरोबरच आरोग्याबाबतची योजनेचा आराखडा बैठकीत मांडला त्याला सर्वांनी सहमती दर्शवली. तसेच लिटल किंग्ज इंग्लिश स्कूलच्या वतीने वसमत तालुका संघटनेतील पदाधिकारी सदस्यांच्या एका पाल्यास सेमी माध्यमाच्या पहिली ते आठवी कोणत्याही एका वर्षाचे मोफत शिक्षण देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी केली.
यावेळी वसमत शहरात मागील 30 ते 35 वर्षापासून इमामी केबल नेटवर्कच्या माध्यमातून समाज जागृती करत असलेले ज्येष्ठ पत्रकार शमीम सिद्दिकी यांची सर्वानुमते संघटनेच्या हिंगोली जिल्हा पर्वक्ता पदी निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षीय समारोपात संजय बर्दापुरे यांनी संस्थेचे संघटन वसमत तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यात प्रबळ करण्यासाठी सर्वांनी गटबाजी, हेवेदावे दूर करू एकत्र यावे असे आवाहन केले. तसेच सतत संघटनेच्या विविध कार्यक्रमास किंवा मासिक बैठकीस उपस्थित न राहणाऱ्या सदस्यांना संघटनेवरून मुक्त करण्यात येईल असे सांगितले. सूत्रसंचालन अँड नाहीद सिद्दिकी यांनी केले तर आभार शहराध्यक्ष गिरीश देशमुख यांनी मानले.