रामनगर पोलिसांची कारवाई : १.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, गावठी मोहा दारूसह आरोपी अटकेत
रामनगर पोलिसांची कारवाई : १.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, गावठी मोहा दारूसह आरोपी अटकेत
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी मोहा दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ४९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन रामनगर येथे नोंद अप. क्र. 406/26 अंतर्गत महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा कलम 65 (अ), (ई) तसेच मोटर व्हेईकल ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी ८.१० ते ८.५० वाजताच्या दरम्यान नटाळा पुनर्वसन, पिंपरी (मेघे रोड) परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाकेबंदी केली असता, आरोपी रवींद्र शंकरराव सलामे (वय ३७, रा. इंदिरा नगर) हा आपल्या ताब्यातील वाहनावर गावठी मोहा दारू विक्रीसाठी घेऊन जात असताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत १६८ लिटर गावठी मोहा दारू (प्रति लिटर २०० रुपये प्रमाणे एकूण ३३,६०० रुपये), ३ प्लास्टिक डबे (६०० रुपये) तसेच सुझुकी कंपनीची अॅक्सेस १२५ दुचाकी (१,१५,००० रुपये) असा एकूण १,४९,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक वैभव कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक शिवानंद वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांच्या नेतृत्वात दारूबंदी पथकातील अधिकारी अवि बनसोड, मुकेश वांदिले, विकी अणेराव, मनोज भोमले यांनी यशस्वीपणे पार पाडली.