नाकेबंदी करून दारूबंदी पथकाची मोठी कारवाई; १२.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी ताब्यात
नाकेबंदी करून दारूबंदी पथकाची मोठी कारवाई; १२.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी ताब्यात
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदी पथकाने नाकेबंदी करून मोठी कारवाई करत विदेशी दारूसह १२ लाख ३६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस स्टेशन रामनगर येथे अप. क्र. 409/26 अन्वये महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा कलम 65 (अ), (ई), 77 (अ), 83 तसेच मोटर व्हेईकल ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. ४ मे २०२६ रोजी पहाटे १.५९ ते २.४० वाजण्याच्या दरम्यान शांतीनगर उड्डाण पुलाजवळ, रामनगर (वर्धा) येथे करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकेबंदी केली असता आरोपी त्यांच्या ताब्यातील इनोव्हा (क्र. MH/31/CR/5760) या वाहनातून विदेशी दारू विक्रीसाठी वाहतूक करताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला व गुन्हा नोंद करण्यात आला.
या कारवाईत ५०० एमएल क्षमतेच्या मॅग्नम बिअरचे ८४ टिन कॅन (प्रति कॅन ३५० रुपये प्रमाणे ३९,६०० रुपये), ऑफिसर चॉइस कंपनीच्या २४ विदेशी दारूच्या बाटल्या (७,२०० रुपये) तसेच इनोव्हा चारचाकी वाहन (१२,००,००० रुपये) असा एकूण १२,३६,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शिवा राजू मडावी (वय ३३, रा. इतवारा बाजार, बुराड मोहल्ला, वर्धा; सध्या रा. सिंदी मेघे, अग्निहोत्री कॉलेज मागे, रामनगर) आणि आकाश राजेश तांबेकर (वय ३६, रा. सानेगुरुजी नगर, वर्धा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांच्या नेतृत्वात दारूबंदी पथकातील अवि बनसोड, मुकेश वांदिले, विकी अणेराव, मनोज भोमले यांनी यशस्वीपणे पार पाडली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.