कै. आनंदराव मेघे विद्यालयात उन्हाळी प्रशिक्षण शिबिरास सुरुवात; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

Mon 04-May-2026,11:21 PM IST -07:00
Beach Activities

कै. आनंदराव मेघे विद्यालयात उन्हाळी प्रशिक्षण शिबिरास सुरुवात; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा बोरगाव मेघे | कै. आनंदराव मेघे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बोरगाव मेघे येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मोहन मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना मोहन मोहिते यांनी शिक्षण केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये कला, क्रीडा, व्यक्तिमत्त्व विकास, भाषण कौशल्य तसेच शारीरिक सुदृढतेवर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी आनंदी व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी प्राचार्य संजय भस्मे यांनी विद्यालयातील शैक्षणिक सुविधा व उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, शाळा संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, क्रीडांगण आदी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून, प्रशिक्षित शिक्षकवृंदामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध आहे.

या प्रसंगी व्ही.पी. बनसोड, एस.जी. धाडसे, एस.व्ही. भगत, अमोल डगवार, जी.एन. साखरे, व्ही.जे. जेऊघाले, ए.एस. उरकंदे, कैलास घागरे, व्ही.पी. फुले, व्ही.टी. खंडारे, एन.व्ही. मलेवार, एस.ए. भोंमले, एस.व्ही. मुंदावने, एन.डी. वाघमारे, एच.व्ही. मरसकोल्हे, पी.व्ही. काळमेघ, एम.डी. खोडे, पी.टी. तेलंग, डी.एच. यादव, एन.पी. लिडबे, के.पी. मुरार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांसाठी नाश्ता व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.