प्रभाग क्र. ७ मध्ये वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न नागरिकांच्या सहभागातून शेकडो वृक्षांची लागवड

Thu 09-Jul-2026,11:12 PM IST -07:00
Beach Activities

प्रभाग क्र. ७ मध्ये वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न

नागरिकांच्या सहभागातून शेकडो वृक्षांची लागवड

वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण

पर्यावरण संवर्धन व हरित प्रभाग निर्मितीचा संदेश देण्यासाठी प्रभाग क्र. ७, नगर परिषद वर्धा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वृक्षारोपण सोहळा शुक्रवारी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकाळी ८ वाजता पावडे चौक येथून वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. "निसर्ग वाचवा, भविष्य घडवा" या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचे आयोजन नगरसेविका सौ. श्वेता वरुण पाठक यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

यावेळी वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष सुधीरभाऊ पांगुळ, माजी नगराध्यक्ष अतुलभाऊ तराळे, माजी नगरसेविका सौ. निर्मलाताई त्रिपाठी, नगरसेवक शैलेंद्र (मुन्नाभाऊ) झाडे, माजी नगरसेवक वरुण पाठक, डॉ. राजेश आसामवार तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात लहान मुले, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा, जांभूळ आदी उपयुक्त वृक्षांची लागवड केली. मान्यवरांच्या हस्ते प्रतीकात्मक वृक्षारोपण करून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत, "वृक्ष लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते जगवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे," असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभाग क्र. ७ मधील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच सर्व नागरिकांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.

याप्रसंगी नीरज त्रिपाठी, विलास आष्टेकर, लीलाधर कावळे, दर्शन राऊत, सुनील चन्नावर, मोहन इंगोले, अनिल खंडाळकर, किरण भिरंगे, सुरेश सलामे, ज्ञानेश्वर अवजेकर, विनय डहाके, पंकज ठाकरे, कवी सातदेवे, उत्तम पोखरे, श्याम लंगडे, अजय डोंगरे, किरण धोंगडे, पाचखेडे काका, अजय भेंडे, संजय भोयर, प्रज्वल धोटे, निखिल ढोले, पराग अवजेकर, प्रतीक माकोडे, रोशन आंबटकर, अनिल डोंगरे, अक्षय कांबळे, अजय बावणे, अखिलेश माकोडे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.