आमदार साहेबांच्या दत्तक गावात युवा पिढी धोक्यात? अवैध मोहाच्या दारूमुळे भवितव्यावर प्रश्नचिन्ह !

Thu 20-Aug-2026,09:44 PM IST -07:00
Beach Activities विकासाच्या वाटेवर सालोड; मात्र अवैध मोहाच्या दारूच्या चर्चेने वाढवली चिंता !

आमदार साहेबांच्या दत्तक गावात युवा पिढी धोक्यात? अवैध मोहाच्या दारूमुळे भवितव्यावर प्रश्नचिन्ह !

दत्तक गावाच्या विकासासोबतच युवा पिढीच्या भवितव्याचीही जबाबदारी नाही का?

युवा सरपंचांच्या गावात अवैध दारूची चर्चा; तरुणांचे भवितव्य धोक्यात जाणार का?

आमदारांच्या दत्तक गावात अवैध मोहाची दारू? चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी कारवाईची मागणी

सालोड हिरापूर परिसरातील अवैध मोहाची दारू, युवकांच्या भवितव्यावर नागरिकांचा सवाल !

विकासाच्या वाटेवर सालोड; मात्र अवैध मोहाच्या दारूच्या चर्चेने वाढवली चिंता !

सालोडच्या युवा पिढीला अवैध दारूपासून वाचविण्याची गरज; प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा !

नावेद पठाण, मुख्य संपादक, वर्धा 

सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालोड हिरापूर परिसरात अवैध मोहाची दारू विक्रीचा प्रकार सुरू असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. परिसरातील काही ठिकाणी मोहापासून तयार करण्यात येणारी दारू बेकायदेशीरपणे विकली जात असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, पोलिस प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे मोहाची दारू तयार करून तिची विक्री केली जात असल्याच्या चर्चामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित होत आहे

गावातील तसेच परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अवैध दारू विक्रीवर वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात हा प्रकार अधिक वाढण्याची शक्यता आहे

अवैध मोहाची दारू तयार करणारे ठिकाण नेमके कुठे आहे? विक्री कोण करीत आहे? या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याची पोलिस प्रशासनाने सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे

परिसरात अवैध दारू विक्रीची चर्चा सुरू असताना

आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे

विशेष म्हणजे मोहाची दारू आरोग्यासाठीही घातक ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या अवैध विक्रीला आळा घालणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावातील तरुणाईवर या प्रकाराचा विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे

संबंधित ठिकाणी नियमित गस्त व तपासणी केली जाते का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी संशयित ठिकाणांची तपासणी करून

विक्रीबाबत सुरू असलेल्या चर्चाची पोलिस प्रशासनाने दखल घेऊन प्रत्यक्ष तपासणी व चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अवैध दारू विक्री आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे दरम्यान, या प्रकाराबाबत पोलिस प्रशासनाकडून अधिकृत माहिती किंवा कारवाई समोर येते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अवैध मोहाची दारू विक्रीच्या चर्चाना पूर्णविराम देण्यासाठी परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सावंगी मेघे ठाण्याचे डीबी पथक करते तरी काय?

सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मोहाची दारू विक्री होत असल्याची चर्चा सुरू असताना, ठाण्याचे डीबी पथक नेमके करते तरी काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळत नाही का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे डीबी पथकाने हद्दीतील अवैध मोहाची दारू विक्रीच्या ठिकाणांची सखोल तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.