परतीच्या प्रवासाकरिता प्रवाशांची कसरत रेल्वेच्या आरक्षण केंद्रावर गर्दी
प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर : दिवाळी सणासाठी घरी येऊन कुटुंबीयासोबत मोठ्या उत्साहात साजरा केला. परंतु, आता नोकरीच्या ठिकाणी परत जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण मिळविण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आता परतीच्या प्रवासासाठी आरक्षण केंद्रावर होणारी गर्दी तसेच ऑनलाइन तिकीट विक्री वाढल्याने, प्रवाशांना तिकिटासाठी अडचण येत आहे.बल्लारशहा रेल्वे स्थानकांवरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. परिणामी दिवाळीसाठी स्वगावी आलेल्या प्रवाशांची परतीच्या प्रवासासाठी तिकीट आरक्षणसाठी रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली आहे. गर्दीच्या या मोसमात प्रवाशांना तिकीट कन्फर्म मिळत नसल्यामुळे प्रवाशां मध्ये रोष निर्माण होत आहे. शासनाने आरक्षित तिकिटाच्या नियमात बदल करण्यात आल्याने प्रवाशांची वेटिंग लिस्ट मोठी झाली आहे. प्रशासनाच्या वतीने स्पेशल ट्रेन सोडण्यात येत आहे. मात्र, या रेल्वे गाड्यांचेही कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांनी इतर पर्यायी मार्गचा अवलंब केल्याचे दिसून येतआहे.प्रशासनाच्यावतीने दिवाळीच्या तोंडावर गर्दी लक्षात घेता स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. असे असतानही प्रवाशांची गर्दी अधिक असल्याने रेल्वेचा ताण वाढला आहे. त्यात ऐन दिवाळीच्या काळात रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होत असल्याने रेल्वे नियमित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने प्रवास त्रासदायक ठरत आहे.