शहीद भगतसिंह जयंती साजरी करण्यात आली

Sun 28-Sep-2025,01:41 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

स्थानिक भगतसिंह चौक अल्लीपूर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगतसिंह दुर्गा मंडळाच्या वतीने शहीद भगतसिंह जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण केले वंदे मातरम् भारत माता की जय असे नारे देत मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे शहीद भगतसिंह यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सतिश कातोरे , अशोक कलोडे,भैय्या कडवे, शंकरलाल खत्री , बळवंत कापशे,नागो खत्री,मोहन कलोडे , निखिल कातोरे,दर्शन कलोडे आदी भगतसिंह दुर्गा मंडळाचे सदस्य उपस्थित होते.