सदानंद मठ अल्लिपूर येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहास प्रारंभ

Wed 21-Jan-2026,12:25 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लिपूर

अल्लीपुर:स्थानिक सदानंद महाराज मठाच्या वतीने संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन 25 ते 1फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या काळात वाङ्मयीन आणि आध्यात्मिक सोहळा पार पडणार आहे.या सप्ताहाचे कथाव्यास ह .भ.प. स्वातीताई किशोर ठेंगणे आळंदीकर मु. मारेगाव ता. मारेगाव जि. यवतमाळ यांच्या शिक्षणभूमी : आळंदी देवाची या प्रवचनाला गावकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ६ ते 8 वाजता काकडा भजन , 8ते 11 संगीतमय भागवत कथा, संध्याकाळी 6 ते7 वाजता हरिपाठ, रात्री 7ते 10 संगीतमय भागवत कथा अशी कार्यक्रमाची रुपरेषा आहे. संगीतमय भागवत कथेमध्ये तबला वादक ह. भ. प.किसन खंडाळकर,गायक ह. भ.प. प्रशांत किंनाके, कीबोर्ड वादक ह.भ.प. आकाश लोखंडे तर झाकीकार ह.भ.प. सुमेध महाराज मेश्राम साथसंगत करतील. 1 फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता दिंडी गावातील प्रमूख मार्गाने निघेल दिंडीमध्ये सहभागी भजनी मंडळाला नारळ पान देण्यात येईल काल्याचे कीर्तन दुपारी 1 वाजता, महाप्रसाद सायंकाळी 5 वाजता होईल. या आध्यात्मिक सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सदानंद मठ कमेटी द्वारे करण्यात आले आहे.