लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेविरोधात महिलांचा संताप; मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन
लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेविरोधात महिलांचा संताप; मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन
वर्धा तालुका प्रतिनिधि इरशाद शाह
वर्धा :महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेत ekYC आणि इतर निकषांच्या नावाखाली महिलांना अपात्र ठरवण्याच्या कारवाईविरोधात वर्ध्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात वर्ध्यातील महिलांसह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लाडकी बहीण योजना सुरू करताना कोणतेही निकष लावण्यात आले नव्हते. मात्र आता अचानक ekYC, चौकशी आणि अटी-शर्ती लावून हजारो महिलांचे मानधन बंद करण्यात येत आहे, ही बाब अन्यायकारक असून महिलांच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात आहे.
निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचे मानधन २१०० रुपये करण्याचे जाहीर आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मानधन वाढवणे तर दूरच, अनेक महिलांना योजनेतून वगळण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, ekYC च्या नावाखाली अपात्र ठरवलेल्या महिलांना तात्काळ पुन्हा पात्र करावे, कोणतेही नवीन निकष न लावता सर्व महिलांना योजनेचा लाभ द्यावा, तसेच १८१ महिला हेल्पलाईन सेवा तात्काळ कार्यान्वित करावी.
या मागण्यांची पूर्तता न झाल्यास मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आमरण उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी सुनीता गायकवाड, भारती थुल,
दुर्गा कातोरे,भाग्यश्री उराडे,रीना नेमाडे,इंदिरा मसराम,युवा: परीवर्तन की आवाज संघटना चे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे,जिल्हा अध्यक्ष विशाल इचपाडे,जिल्हा संघटक दिनेश परचाके,जिल्हा सम्पर्क प्रमुख अमित भोसले, ,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
सुनीता गायकवाड,भारती थुल,
दुर्गा कातोरे,भाग्यश्री उराडे,रीना नेमाडे,इंदिरा मसराम,युवा: परीवर्तन की आवाज संघटना चे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे,जिल्हा अध्यक्ष विशाल इचपाडे,जिल्हा संघटक दिनेश परचाके,जिल्हा सम्पर्क प्रमुख अमित भोसले, शेखर इंगोले,अमोल ठाकरे,आशिष जाचक, वर्धा तालुका प्रमुख इरशाद शहा,मनोजभाऊ कळमकर,उपाध्यक्ष वर्धा अमन नारायण,दिनेश देवतळे,शुभम निमजे,अमीन पठाण, प्रशांत गुरनुले,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.