डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नारी सन्मान सत्कार सोहळा’ उत्साहात संपन्न

Sun 19-Apr-2026,12:23 AM IST -07:00
Beach Activities

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नारी सन्मान सत्कार सोहळा’ उत्साहात संपन्न

 

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ तसेच दलित-बौद्ध चळवळीचे नेते, अस्पृश्यता निर्मूलन व महिला-श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‘नारी सन्मान सत्कार सोहळा’ मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता वर्धा जिल्हा काँग्रेस मुख्यालय, इंदिरा सद्भावना भवन, मगन संग्रहालयासमोर, बॅचलर रोड, वर्धा येथे उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव अर्चनाताई भोमले यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, सर्व समाजाबद्दलची त्यांची तळमळ आणि सामाजिक न्यायासाठीचे योगदान सर्वपरिचित असून, त्यांच्या जयंतीनिमित्त देश-विदेशात मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे केले जातात, असे यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून प्राचार्या पद्माताई तायडे, प्रमुख पाहुण्या ज्योतीताई चारभे व डॉ. माधवी पाटील उपस्थित होत्या. अध्यक्षस्थान वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी भूषविले. विशेष अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक धर्मपाल ताकसांडे यांच्यासह नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, अभुदय मेघे, सुरेश ठाकरे, सुनील कोल्हे, महिला जिल्हाध्यक्षा अरुणा धोटे, प्रा. जनार्दन देवतळे, प्रा. अशोक चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मीराताई इंगोले, घनेश्वरी येणडे, माधुरी सातपुडके, राधिका मुन, छाया चहांदे, सुनंदा मेश्राम, ज्योती ताकसांडे, अनिता बरके, दीपीका मुनेश्वर, सोनाली राऊत, रेखा जुगनाके, वंदना मंथनवार, रिंकू घोडेस्वार, नीलिमा सिंगम, वंदना गुंडतवार, सादिया शेख आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक करताना अर्चनाताई भोमले म्हणाल्या की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा मंत्र दिला आहे. मात्र, आजही आपण पूर्णपणे संघटित न झाल्याने अनेक समस्या कायम आहेत. त्यामुळे महिलांनी एकजुटीने पुढे येऊन कार्य करणे गरजेचे आहे.”

कार्यक्रमाचे संचालन श्रावणी इटनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन व्हीजेएनटी जिल्हाध्यक्षा सोनाली कोपुलवार यांनी केले. यावेळी नरेंद्र मसराम, प्रभाकरराव मस्के, विजय नरांजे, नंदकुमार कांबळे, ऋतूजा भोयर, नंदकुमार वानखेडे, सादिक शेख, सुनील कोपुलवार, राजेंद्र भोमले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.