वर्ध्यात प्राणी रुग्णवाहिकेचे लोकार्पण; पशुसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

Sun 12-Apr-2026,09:44 PM IST -07:00
Beach Activities

वर्ध्यात प्राणी रुग्णवाहिकेचे लोकार्पण; पशुसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

( मुख्य संपादक नावेद पठाण वर्धा )

वर्धा शहरातील स्वर्गीय राधाकृष्ण बजाज गोशाळा, नालवाडी रोड येथे भव्य प्राणी रुग्णवाहिका (Animal Ambulance) लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे जखमी व आजारी पशूंना तात्काळ उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

या कार्यक्रमाला माहेश्वरी अॅनिमल्स फाउंडेशन, नागपूरचे अजय माहेश्वरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्राणी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिका अध्यक्ष सुधीर पागुडे होते.

कार्यक्रमाची सुरुवात गोमातेच्या पूजनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवर व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला. यावेळी गोशाळेतर्फे सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. विशेषतः गोबरापासून तयार केलेल्या मूर्ती व “जय श्री राम” उपरणे देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास प्राणी कल्याण अधिकारी राम नंदनवार, माजी नगरसेवक शेर भाटिया, सिंधी समाज अध्यक्ष कन्हैया चैनानी, बोरगाव ग्रामपंचायत सरपंच संतोष सेलुकार, श्रीरामायण भजन मंडळी (हनुमान टेकरी) चे सतीश ढगे, सुशील दीक्षित, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजानंद आदमने, नगरसेविका वंदना बुते, तसेच जय बजरंग सेवा समितीचे रवि मनोजा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय आयोजन समितीचे सदस्य शुभम बत्रा, रोशन पटेल, रोहित दुरगडे, सूरज सोमनाथे, संकेत श्रीगोड, सचिन वडाई, साहिल परियाल, आकाश सोमनानी, अक्षय मोटघरे, विकास शास्त्री, जितेंद्र गेलानी, रंजित हिवनाते, आकाश राजुकर, आनंद सोमनानी आदींसह मोठ्या संख्येने गोसेवक व नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माहेश्वरी अॅनिमल्स फाउंडेशन, नागपूर, गौ रक्षा हिंदू दल (वर्धा जिल्हा), राधाकृष्ण बजाज गोशाळा, जैन गोशाळा नागपूर, जय बजरंग सेवा समिती व विविध सामाजिक संस्थांचे मोलाचे योगदान लाभले.

महत्त्वाचा संदेश :

वर्धा जिल्ह्यात पशुधनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून, पशू चोरी, आजारपण व बेवारस अवस्थेत मृत्यूच्या घटना वाढत आहेत. अशा परिस्थितीत गौ रक्षा हिंदू दल गेल्या आठ वर्षांपासून हजारो गोवंशांची सेवा व उपचार करत आहे.

माहेश्वरी अॅनिमल्स फाउंडेशन, नागपूर यांनी दिलेली ही प्राणी रुग्णवाहिका गोसेवा कार्याला नवे बळ देणार असून, जखमी व आजारी पशूंना वेळेवर उपचार मिळण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.