समाजात एकोपा आणि आपुलकीची भावना निर्माण करणे गरजेचे :- इमरान राही

Wed 15-Apr-2026,04:10 AM IST -07:00
Beach Activities

समाजात एकोपा आणि आपुलकीची भावना निर्माण करणे गरजेचे : इमरान राही

भारतीय संविधानाचे वितरण व परिसंवाद सोहळा सम्पन्न

( नावेद पठाण मुख्य संपादक )

वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेवर आधारित भारताची जडणघडण अनेक महत्वाच्या स्तंभांवर उभी आहे. त्यांनी समता, स्वातंत्रय, बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारित समाजाचे स्वप्न पाहिले होते. डॉ. आंबेडकरानी लोकशाही, मुलभुत अधिकार, आणि सामाजिक न्याय देणारे संविधान तयार केले, कायद्यासमोर सर्व नागरिक समान ही संकल्पना त्यांनी मांडली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही ही उपेक्षितांना न्याय देणारी आणि मानवी प्रतिष्ठा जपणारी होती. त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा हा मंत्र आजही लोकशाही मुल्ये जोपसण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. आजच्या काळात त्यांची ही लोकशाहीची संकल्पना आत्मसात करणे, तसेच समाजात एकोपा आणि आपुलकीची भावना निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यकार इमरान राही यांनी व्यक्त केले.

ते 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात ऑल इंडिया समता सैनिक दल वर्धा व्दारे आयोजित भारतीय संविधानाचे वितरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही या परिसंवाद सोहळ्या प्रसंगी मुख्य वक्त म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अनिल खडतकर होते तर प्रमुख अथिती म्हणून मुख्याध्यापक विनोद जवादे, डॉ. मिलींद सवाई, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य राजु लभाणे, समता सैनिक दलाचे विदर्भ सचिव प्राचार्य रमेश निमसडकर, जिल्हा सहसचिव सुनील बाभळे, शाखाध्यक्ष प्रबोधनकर प‌द्माकर कांबळे एडव्होकेट निखिल बुरबुरे, तालुका बौध्दिक प्रमुख रचना नगराळे, जिल्हा उपाध्यक्ष सरिता कुसळे, तालुका अध्यक्ष संदीप थूल, अॅड लोव्हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

अॅड निखिल बुरबुरे, रचना नगराळे, सरिता कुसळे, डॉ. मिलींद सवाई, अनिल खडतकर, इमरान राही यांनी या परिसंवाद कार्यक्रमात आपले विचार मांडले प्रास्ताविक प्राचार्य रमेश निमडकर संचालन चरण गायकवाड तर आभार लीना पाटील यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता धर्मपाल गोटे मधुकर ओंकार, दिलीप वैध, सचिन फुलझेले, नजीर भाई मिलींद मुन, प्रफुल बनसोड, कूणता मून, सुवर्णा बाभळे, संध्या चंदनखेडे यांनी अथक परिश्रम घेतले पाहुण्यांच्या हस्ते 200 संविधानाची प्रत वितरीत करण्यात आली कार्यक्रमाला मोठ्या संख्यानी नागरीक उपस्थित होते.