महात्मा जोतिबा फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी

Sun 12-Apr-2026,07:18 AM IST -07:00
Beach Activities

महात्मा जोतिबा फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी

वर्धा : प्रतिनिधी युसूफ पठाण

वर्धा : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, वर्धा जिल्हा तसेच साईनगर आयोजन समितीच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी वर्धा शहराचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम अधोरेखित केला. त्यांनी सांगितले की, महात्मा फुले यांच्या प्रयत्नांमुळे समाजात महत्त्वपूर्ण बदल घडून आले असून त्यांच्या विचारांमधून आजही समाजाला प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा सन्मान करणे म्हणजे समान व न्याय्य समाज उभारण्याच्या त्यांच्या ध्येयाची आठवण ठेवणे होय.

यावेळी वर्धा जिल्हा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल हजारे यांनीही मनोगत व्यक्त करत, महात्मा फुले यांचे सामाजिक न्याय व समतेसाठीचे योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमास विशाल हजारे, कुमुद मधापुरे, बजरंग पिसलवार, विनय डहाके, प्रदीप देशकर, बंटी खडसे, विक्रांत चौधरी, भरत चौधरी, अविनाश गवळी, मंगेश खेडकर, अनुप कडू, महेश जगदने, गणेश नागतोडे, संजय भगत, कपिल थुटे, संजय कोकाटे, गुणवंत डकरे, किरण कडू, सतीश भोयर, संदीप चाटे, जयंत भालेराव, चंदू घोडे, हर्ष उभाळे, प्रदीप कडू तसेच सहकारनगर व साईनगर आयोजन समितीचे सुनील मोहोळ, किरण मिसाळ, अजय गावडे, सुनील इंगोले, अमोल देशपांडे, कुणाल इखार, मंगेश गांडोळे, उमाकांत मुळे व देविदास भोंगे आदी उपस्थित होते.