खरगे यांच्यावरील वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन; कठोर कारवाईची मागणी
खरगे यांच्यावरील वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन; कठोर कारवाईची मागणी
वर्धा, (प्रतिनिधी – युसूफ पठाण)
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात केल्याच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच पवन खेड़ा यांना कथितरित्या बेकायदेशीर पद्धतीने राज्याबाहेर नेऊन अटक करण्याच्या प्रयत्नाविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे वर्ध्यात आंदोलन करण्यात आले.
१० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. हे आंदोलन प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश सचिव अफजल बेरा यांच्या नेतृत्वात पार पडले. यावेळी वर्धा जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सादर केलेल्या निवेदनात संबंधित वक्तव्याबाबत तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अशा प्रकारच्या लोकशाहीविरोधी घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. देशातील सर्व नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण सुनिश्चित करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात अंकुश मुंजेवार, राहुल सुरकार, गोविंद दिघीकर, नंदकुमार कांबळे, शैला दीक्षित, श्रीकांत धोटे, अनिकेत दाते, गौरव पहाडे, हेमराज खंडाले, साहिल पाटील, शुभम अरगुडे, शिवराज भालचंद्र, यश चामलोन, पूर्णिमा मून, पराग पिंपळे आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
या आंदोलनाद्वारे युवक काँग्रेसने केंद्र व राज्य सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही दिला.