वर्धा शहरात पानठेल्यावर चोरी; ४,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास

Wed 08-Apr-2026,12:10 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा शहरात पानठेल्यावर चोरी; ४,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास

( नावेद पठाण मुख्य संपादक )

वर्धा, दि. ८ एप्रिल २०२६ वर्धा शहरातील स्टेशन फेल परिसरात, रेल्वे स्टेशनसमोरील पानठेल्यावर अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत सुमारे ४,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकीब खान बिसमीना खान (वय ३०, रा. स्टेशन फेल, नुरी मस्जिद जवळ, वर्धा) यांचा “फ्रेंड्स डेली नीड्स अॅण्ड पान पॅलेस” नावाचा पानठेला रेल्वे स्टेशनसमोर आहे. ते दररोज सकाळी ७ वाजता पानठेला सुरू करून रात्री सुमारे १०.३० वाजता बंद करतात.

दि. ७ एप्रिल रोजी रात्री नेहमीप्रमाणे पानठेल्याला कुलूप लावून ते घरी गेले. मात्र, दि. ८ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजता पानठेला उघडण्यासाठी गेले असता बाजूच्या टिनच्या दरवाज्याचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचे आढळले.

यानंतर पानठेल्याची पाहणी केली असता कोल्ड्रिंक्सच्या स्प्राईट, फ्रुटी व थम्सअपच्या प्रत्येकी एक अशा तीन पेट्या (प्रती पेटी ५०० रुपये, एकूण १,५०० रुपये) तसेच अंदाजे ३,००० रुपयांची चिल्लर रक्कम असा एकूण ४,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

ही घटना दि. ७ एप्रिल रात्री १०.३० ते दि. ८ एप्रिल सकाळी ७.३० दरम्यान घडल्याचा अंदाज असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.