अनधिकृत विटभट्टी धारकांना अभय देणारे वसमतचे अकार्यक्षम व वादग्रस्त तहसीलदार यांची हकालपट्टी करून कार्यक्षम तहसीलदारांची नियुक्ती करण्याची मागणी.
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथील शहरालगत शेकडो अनधिकृत वीट भट्ट्यांनी विळखा घातला असून कौठा रोड परिसरात अक्षरक्षा ये-जा करणे मुशकील झाले आहे,रस्त्यावरून जातांना दमछाक होत आहे, याला कारणीभूत त्या परिसरात असणाऱ्या अनधिकृत वीट भट्या आहेत, ह्या अनधिकृत वीट भट्ट्या हटविण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सत्तत पाठपुरावा करत आहे. परंतु त्यांना पाठीशी घालण्याला जबाबदार वसमतच्या तहसीलदार. शारदा दळवी ह्या असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे त्याचे परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहे, गत वर्षी याच वीट भट्ट्यावर माती घेऊन जाणाऱ्या हायवाने निषपाप दोन लोकांचा बळी घेतला होता, त्यानंतर विट भट्ट्या विरोधात मोहीम राबविली होती, दिनांक 03/04/2026 रोजी दैनिक देशोन्नती वृतपत्रात संबंधिताकडून एकही रुपया वसुल करण्यात आले नसल्याचे बातमी छापून आली आहे त्यामुळे संबंधित वीट भट्टी धारकांचे मनोबल वाढले आहे, पुन्हा 29 मार्च रोजी वसमत परभणी रोडवर जिरो फाट्या जवळ वीट भट्ट्यासाठी माती वाहतूक करणाऱ्या हायवाने एका कार चालकचा बळी घेतला . त्यामुळे गत वर्षाची पुनरअवृत्ती झाली आहे,
शारदा दळवी यांचा कार्यकाळ नेहमीच वादग्रस्त राहिला असून या पूर्वी तहसील कार्यालयातील तत्कालीन नायब तहसीलदार मा.तेलंग यांनीही तहसीलदार यांच्या मनमानी व हुकूमशाही विरोधात तक्रार दाखल केली आहे, विद्यमान मंडळ अधिकारी. प्रियंका खडसे ह्या तहसीलदार यांच्या सोईनुसार ड्युटी करत नसल्यामुळे त्यांना जातीसूचक शब्द वापरून अपमानित केल्यामुळे तक्रार दाखल केली आहे, आर.पी.आय.पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष कैलास निकाळजे यांनी तहसीलदार यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे, मनसेचे तालुका अध्यक्ष काशिनाथ टोंपे यांची तहसीलदार यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे,सामाजिक कार्यकर्ते विष्णू जाधव यांनी तहसीलदार यांनी अवैध गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्या लोकांना अभय दिल्यामुळे शासनाच्या महसूलाचे आर्थिक नुकसान होत असल्याबाबत तक्रार दिली आहे, पत्रकार रुपेश एंगडे यांनीही अवैध वीट भट्ट्या बाबत अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलन ही केले आहेत या सह अनेक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी ही तहसीलदार यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत परंतु त्यांच्यावर अदयाप कुठलीच कार्यवाही झाली नसल्यामुळे नेमके तहसीलदार यांना अभय कुणाचे हा प्रश्न उद्भवत आहे,
मागील दोन वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांचे 85 ब, 7 ब यासारखे अनेक प्रकरण प्रललंबीत आहेत, जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी, नक्कलेसाठी आर्थिक लूट होत आहे, अधिकारीच मुजोर झाले असल्यामुळे कर्मचारी गेंड्याच्या कातडीचे झाली आहेत त्यामुळे ते कुणाचे ही एक ऐकत नाहीत,
वसमत तालुक्यात अनेक विकास कामे सुरु आहेत त्या विकासकामाला महिन्याकाठी हजारो ब्रास दगड मुरुमाचे उत्खनन होत आहे परंतु काही कंपनीधारक उत्खनन करण्यासाठी परवानगी न घेता बिनधास्त राजरोसपने अवैधरित्या उत्खनन करून चोरीच्या मार्गाने वाहतूक करत आहे.त्यामुळे शासनाला मिळनाऱ्या महसूलाचे नुकसान होत आहे,
तहसीलदार यांच्या मनमानी व मुजोरशाहीच्या विरोधात तक्रार किंवा निवेदन दिले की त्या महिला तहसीलदार असल्याच्या गैरफायदा घेऊन संबंधित तक्रारदारासोब अरेराविची भाषा वापरून , दमदाटी करून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत आहेत त्यामुळे जनतेचे सेवकच (लोकसेवक) जनतेचे मालक व अवैध गौण खनिजाचे उत्खनन करणारे आणि अनधिकृत विट् भट्ट्या धाराकांचे सहकारी बनले असल्याचे चित्र दिसून येत आहे,
त्यामुळे अश्या बेजबादार, व वादग्रस तहसीलदार यांचे निलंबन करून हकालपट्टी करावी व त्याठिकाणी कार्यक्षम तहसीलदार यांची नियुक्ती करून सर्वसामान्य जनतेला न्याय दयावा अन्यथा आम्ही जणआंदोलन उभारू अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे महसूल मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे🖤.