ह.अ.मौलवी जब्बार इर्फानी यांच्या ६१ व्या ऊर्स निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत येथील प्रसिद्ध दर्गाह ह.स.अ.मौलवी जब्बार इर्फ़ानी यांच्या ६१ व्या ऊर्स निमित्त १२ ते १४ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितिने दिली आहे,महाराष्ट्रासह अन्य राज्यात प्रसिद्ध असलेल्या ह.अ.मौलवी जब्बार मो.मोहम्मदुल स.अलमारुफ़ मौलवी सय्यद इरफ़ान अलीशहा नबिरा बंदानवाज़ गेसुदराज़ (रह.) वसमत जि.हिंगोली यांचा ६१ वा ऊर्स ह.अ.ख़लील सहाब क़िबला सज्जादा नशीन बारगाहे क़िबला (रह.) यांच्या मार्गदर्शनाखाली व हकीम उमरबिन अहेमद अलमारुफ़ फैजअलीशहा इर्फ़ानी संगारेडडी (तेलंगणा), यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे,
१२ एप्रिल रोजी सकाळी शासकीय रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम, सायंकाळी पारंपारिक पद्धतीने ऊर्स व संदल मिरवणुक शहरातील मुख्य मार्गाने निघुन परत दर्गाह ह.इर्फ़ानी येथे येऊन संदल चढ़विण्यात येणार आहे.
१३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता दर्गाह परिसरात भोजनदान व महेफिले समा कार्यक्रम होणार आहे तर १४ एप्रिल रोजी पहाटे खत्मेकुरआन शरीफ,फातेहा व चादरगुल सह (तबरुख) महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
सर्व धर्म समभावाचे प्रतिक असलेल्या वसमत येथील ह.अ.मौलवी जब्बार इर्फ़ानी यांच्या ऊर्स निमित्त दरवर्षी तेलंगाना,हैद्राबाद, कर्णाटक,महाराष्ट्रातआदि ठिकाणाहुन भावीक मोठया संख्येने हाजेरी लावतात .
ऊर्स कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवा निवृत नायब तहसीलदार सय्यद महेमूद,संयोजन समितिचे अध्यक्ष मैनोद्दीन संदलजी, कोषाध्यक्ष महमद युसुफ,उपाध्यक्ष अब्दुल जलील,फेरोज पठान,सय्यद खदिर आदि सह समाज बांधव परिश्रम घेत आहे.