हिंगणघाट पोलिसांची दारूबंदी कायद्यान्वये धडक कारवाई; 22.94 लाखांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट पोलिसांची दारूबंदी कायद्यान्वये धडक कारवाई; 22.94 लाखांचा मुद्देमाल जप्त
अब्दुल कदीर बख्श
हिंगणघाट (जि. वर्धा) येथील पोलीस स्टेशनच्या पथकाने दारूबंदी कायद्यान्वये मोठी कारवाई करत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाड टाकून तब्बल 22 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 10 एप्रिल 2026 रोजी पहाटे 1.00 ते 2.20 वाजण्याच्या दरम्यान मौजा संत ज्ञानेश्वर वार्ड परिसरात करण्यात आली. पोलीस निरीक्षक अनिल शिवराम राऊत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संशयित पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ (MH-05-CV-6331) थांबवून तपासणी केली असता गाडीत मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी व देशी दारूचा साठा आढळून आला. तपासणीदरम्यान ROYAL STAG कंपनीच्या 2 लिटर क्षमतेच्या 8 खर्ड्यांच्या खोक्यांमध्ये एकूण 48 प्लास्टिक सिलबंद बंपर बाटल्या (बॅच नंबर 0147, दिनांक 09/01/2026, L-2 GOA) प्रत्येकी 3000 रुपये दराने एकूण 1,44,000 रुपयांचा मुद्देमाल, तसेच रॉकेट कंपनीच्या संत्रा फ्लेवरच्या 90 एमएल क्षमतेच्या देशी दारूच्या 65 खर्ड्यांच्या खोक्यांमध्ये एकूण 6,500 बाटल्या (बॅच नंबर 497 FEB-26 L2A) प्रत्येकी 100 रुपये दराने एकूण 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याशिवाय अवैध दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी, ज्याची अंदाजे किंमत 15,00,000 रुपये आहे, अशी एकूण 22,94,000 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. या प्रकरणी अप.क्र. 506/2026 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(e), 77(a), 83 तसेच 130/177 मोवाका अंतर्गत गाडी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून फिर्यादी म्हणून पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांनी लेखी तक्रार दिली आहे. सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार किशोर गाडीवान (बकल नं. 888) यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल राऊत करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सपोनी दीपक वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक महेश इटकल तसेच पोलीस कर्मचारी अनिल केकतपुरे, दिलीप पवार, प्रवीण बोधाने, कृष्णा माने, प्रमोद दडमल, सागर समृतवार आणि मंगेश वाघमारे यांनी सक्रिय सहभाग घेतला. या धडक कारवाईमुळे हिंगणघाट परिसरातील अवैध दारू वाहतुकीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.