भूदान चळवळ व अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त आचार्य विनोबा भावे यांना अभिवादन

Sat 18-Apr-2026,03:28 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली : वसमत येथे हिंसा, बेरोजगारी, अशांततेवर संवादातून तोडगा शोधण्यासाठी पादाक्रांत करणाऱ्या भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी उभारलेल्या भूदान चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. १८ शनिवारी वसमत येथे अभिवादन करण्यात आले. 

महाराष्ट्र सर्वोदय मंडळ, गंगाप्रसादजी अग्रवाल सर्वोदय कार्यालय, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन उपक्रम पार पडले. प्रारंभी आचार्य विनोबा भावे, प्रथम भूदाते रामचंद्र रेड्डी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. आचार्य विनोबा भावे यांना १८ एप्रिल, रोजी विधिज्ज्ञ रामचंद्र रेड्डी यांच्याकडून आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे पहिले भूदान झाले. भूदान घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. सुईच्या टोकाएवढी देखील जमीन देणार नाही अशा भूमिकेतून महाभारत घडलेल्या भारतीय भूमीवर दानविरांनी लाखो एकर जमीन दान केली. हि प्रबोधनात्मक किमया चर्चा, संवाद, पदयात्रेतून आचार्य विनोबा भावे यांनी साध्य केली. 'दानं समं विभागं" हे सूत्र साधण्यासाठी विनोबा भावे यांनी तब्बल तेरा वर्षे देशातील विविध प्रांतात पदयात्रेतून भूदान मिळविले. "करूण्य" भावनेतून स्वेच्छेने नागरिकांकडून भूमिहीनांकरिता जमीनीचा पाचवा भाग विनोबा भावे यांना दान प्राप्त झाले. भूदान हे मानवी इतिहासातील एकमेव उदाहरण राहिले जेथे साम्ययोग साधण्यासाठी विनोबा भावे यांच्या मार्गदर्शनात  

नियोजनबद्ध सर्वोदय कार्यकर्त्यांनी उन , पाऊस, वारा यांची तमा न बाळगता भारतभर पादाक्रांत केले असल्याचे महाष्ट्र सर्वोदय मंडळाचे महामंत्री विशाल अग्रवाल यांनी सांगितले. "कानून भय निर्माण करता है, हमें तो लोकनीती और करूणा पर आधारित निर्भय समाज निर्माण करना है" असा समाजप्रबोधनाचा संदेश आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीतून जगातील शासकांना दिला आहे. या वेळी सर्वोदय मंडळ, नशाबंदी मंडळाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.