अजनी स्थानकावर रेल्वे थांब्याची मागणी; वर्धा जिल्हा काँग्रेसचे निवेदन

Thu 16-Apr-2026,10:27 PM IST -07:00
Beach Activities

अजनी स्थानकावर रेल्वे थांब्याची मागणी; वर्धा जिल्हा काँग्रेसचे निवेदन

वर्धा. प्रतिनिधी यूसूफ पठाण

वर्धा जिल्हा काँग्रेसच्या वतीने अजनी रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी करत आज वर्धा रेल्वे स्थानकावर निवेदन सादर करण्यात आले. 

“दुरंतो रेल्वे वर्धा स्टॉप” कार्यक्रमानंतर ही मागणी अधिकृतपणे मांडण्यात आली.

या वेळी वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री. अमरभाऊ काळे यांच्याशी चर्चा करून अजनी स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. 

वर्धा, पुलगाव, सिंधी रेल्वे, धामणगाव तसेच परिसरातील ग्रामीण भागातून दररोज हजारो प्रवासी नागपूरकडे नोकरी, शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय सेवा, कोचिंग क्लासेस आणि बँकिंग कामांसाठी प्रवास करतात. दिवसाला सुमारे दहा हजार प्रवासी रेल्वेचा वापर करत असल्याने काही निवडक गाड्यांना अजनी येथे थांबा दिल्यास प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होईल, तसेच इतर गाड्यांवरील गर्दीही कमी होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

अजनी स्थानकावर थांब्यासाठी सुचविण्यात आलेल्या गाड्या

आझाद हिंद एक्सप्रेस 12130 हावडा.पुणे 12129 पुणे.हावडा

प्रेरणा एक्सप्रेस 22138 अहमदाबाद.नागपूर 22137 नागपूर.अहमदाबाद

दक्षिण एक्सप्रेस.12722 हजरत निजामुद्दीन–हैदराबाद

अमरावती–जबलपूर एक्सप्रेस (12159 अमरावती.जबलपूर 12160 जबलपूर.अमरावती)

बिलासपूर.पुणे एक्सप्रेस 12849 बिलासपूर–पुणे 12850 पुणे–बिलासपूर

हे निवेदन काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेस प्रेमी यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले.

अजनी स्थानकावर थांबा मंजूर झाल्यास नागपूरकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.