कै. आनंदराव मेघे विद्यालयाच्या विद्यार्थिनी सुवर्णा कांबळेचे घवघवीत यश
कै. आनंदराव मेघे विद्यालयाच्या विद्यार्थिनी सुवर्णा कांबळेचे घवघवीत यश
दहावी परीक्षेत ९८ टक्के गुण; रोटरी क्लबकडून उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात
( मुख्य संपादक नावेद पठाण वर्धा )
वर्धा : कै. आनंदराव मेघे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बोरगाव (मेघे) येथील विद्यार्थिनी कु. सुवर्णा महेंद्र कांबळे हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे परिसरात तिचे कौतुक होत आहे.
अत्यंत प्रतिकूल आणि गरिबीच्या परिस्थितीत सुवर्णाने हे यश मिळवले आहे. तिचे आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. किरायाच्या घरात राहून दोन मुलांचा सांभाळ करत असताना सुवर्णाने कठोर मेहनत आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले.
सुवर्णाच्या गुणवत्तेची दखल घेत रोटरी क्लब, वर्धा यांनी तिला अमरावती येथील शिखर क्लासेसमध्ये प्रवेश मिळवून दिला असून तिच्या शिक्षणासाठी लागणारा सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च स्वीकारला आहे.
यावेळी आयोजित अभिनंदन सोहळ्यात बोलताना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मोहन मोहिते यांनी, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हाच असा मार्ग आहे जो माणसाला प्रगतीच्या शिखरावर पोहोचवतो,” असे प्रतिपादन केले. सुवर्णाचे आयटी इंजिनिअर होण्याचे स्वप्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी प्राचार्य संजय भस्मे यांच्यासह व्ही. पी. बनसोड, एस. जी. धाडसे, कैलास घागरे, एस. व्ही. भगत, अमोल डगवार, जी. एन. साखरे, ये. व्ही. जेऊघाले, ए. एस. उरकंदे, व्ही. पी. फुले, व्ही. टी. खंडारे, एन. व्ही. मलेवार, एस. ए. भोंमले, एस. व्ही. मुंदावने, एन. डी. वाघमारे, एच. व्ही. मरसकोल्हे, पी. व्ही. काळमेघ, एम. डी. खोडे, पी. टी. तेलंग, डी. एच. यादव, एन. पी. लिडबे, के. पी. मुरार मॅडम, गिरी सर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी सुवर्णाचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.