दोन तासांत चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत; सावंगी पोलिसांची तत्पर कारवाई

Thu 28-May-2026,04:23 AM IST -07:00
Beach Activities

दोन तासांत चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत; सावंगी पोलिसांची तत्पर कारवाई

प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा 

वर्धा : सावंगी (मेघे) पोलीस स्टेशन हद्दीत चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या दोन तासांत शोधून काढत सावंगी पोलिसांनी तत्परतेचे दर्शन घडविले. तसेच या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद बाळूजी शेंडे (रा. मांडवगड, ता. जि. वर्धा) यांनी 15 मे 2026 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास इंद्रापुर ग्रामपंचायत जवळ आपली पॅशन प्लस मोटारसायकल (क्र. MH 32 AN 6631) उभी करून नाश्ता करण्यासाठी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरी केली. याप्रकरणी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान सावंगी इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून प्रेम कमलाकर वाघ (वय 26, रा. इंद्रापुर, ता. जि. वर्धा) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेली पॅशन प्लस मोटारसायकल, किंमत अंदाजे 50 हजार रुपये, जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक मसराम वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद फेकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे यांच्या नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल संजय पंधाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैद्य, निखिल मुठे, हर्षवर्धन मून व आकाश जाधव यांनी केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंधाई करीत आहेत.