बोगस बियाणे विक्री प्रकरणात आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बोगस बियाणे विक्री प्रकरणात आरोपी पोलिसांच्या ताब्यात
आर्वी पोलिसांची मोठी कारवाई; २९ लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा : युसूफ पठाण
वर्धा : आर्वी पोलिसांनी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध मोठी कारवाई करत २९ लाख ४६ हजार ८४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय यादवराo बनमोटे (वय ५०) यांनी आर्वी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, संजय भारतराव गोपाळे (वय ५२, रा. शिरपूर बके, ता. आर्वी, जि. वर्धा) हा बोगस बियाण्यांचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली.
या प्रकरणी आर्वी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ३०३/२०२६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी विविध कंपन्यांच्या नावाने बोगस कापूस बियाण्यांची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्याचे पोते जप्त केले असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २९ लाख ४६ हजार ८४६ रुपये असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आर्वी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीष डेहनकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस हवालदार दिंगांबर रुईकर, अक्कुश निचत, श्रेणिकेश धंगारे तसेच पोलीस कर्मचारी सुरजसिंग बावरी, सागर पाचोडे, सुरज रिठे, संजय बोके, बालाजी मसके व प्रशांत नरबरीया यांनी केली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.